उसात अन् बळीराजाच्या डोळ्यातही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:27 AM2021-09-09T04:27:37+5:302021-09-09T04:27:37+5:30

---- इलेक्ट्रिक मोटारीही वाहून गेल्या सीना नदीला अचानक पूर आल्याने पिकामध्ये चार ते पाच फूट पाणी साचून राहिले आहे. ...

Tears in the eyes of Usab and Baliraja too | उसात अन् बळीराजाच्या डोळ्यातही पाणी

उसात अन् बळीराजाच्या डोळ्यातही पाणी

Next

----

इलेक्ट्रिक मोटारीही वाहून गेल्या

सीना नदीला अचानक पूर आल्याने पिकामध्ये चार ते पाच फूट पाणी साचून राहिले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शुगर बेल्ट म्हणून समजला जाणाऱ्या सीना नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. तूर, उडीद, सोयाबीन या पिकांमध्ये पाणी राहिल्याने त्वरित पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. सीना नदीला पूर आल्याने पात्रातील मोटारी वाहून गेल्या आहेत.

कर्ज काढून जोपासलेल्या ऊस पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ऊस पडून नुकसान झाले असून, नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने मोठ्या प्रमाणात मदत करत दिलासा देण्याची गरज आहे.

-पांडुरंग शिंदे, निमगाव शेतकरी

---

तुरी व उडदाच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पीकविमा व शासनाने मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

- संदीप साठे शेतकरी, माढा

----

निमगाव येथील शेतकऱ्याच्या उसामध्ये असे पाणी साठले आहे.

---

Web Title: Tears in the eyes of Usab and Baliraja too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.