सोलापूर शहराच्या समांतर जलवाहिनीचा तांत्रिक अहवाल शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:22 PM2018-03-09T14:22:11+5:302018-03-09T14:22:11+5:30

६९२ कोटी खर्च अपेक्षित, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिला अहवाल

The technical report of the solar water pipeline of Solapur City | सोलापूर शहराच्या समांतर जलवाहिनीचा तांत्रिक अहवाल शासनाकडे

सोलापूर शहराच्या समांतर जलवाहिनीचा तांत्रिक अहवाल शासनाकडे

Next
ठळक मुद्दे६९२ कोटींच्या योजनेतही दोन टप्पे करण्याचे नियोजन प्रशासनाने केलेपहिल्या टप्प्यात जॅकवेल व पंपिंग हाऊसचे कामउजनी ते पाकणी व सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित

सोलापूर : शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या सहाय्याने मार्गी लावण्यात येणारी ६९२ कोटी खर्चाच्या समांतर जलवाहिनीचा तांत्रिक अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणीने गुरुवारी शासनाला सादर केला आहे.

मनपाने यापूर्वी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १२४० कोटींची योजना तयार केली होती. यात २०४५ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी इतकी मोठी योजना साकार करण्यासाठी निधी देणे शासनाला शक्य नसल्याचे सांगून दोन टप्पे करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने या योजनेतील काही भाग बाजूला ठेवून ६९२ कोटींची योजना तयार केली आहे. ही योजना मार्गी लावावी म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.  

 ६९२ कोटींच्या योजनेतही दोन टप्पे करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कामानुसार खर्चाचे भाग पाडण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात जॅकवेल व पंपिंग हाऊसचे काम असेल. त्यानंतर उजनी ते पाकणी व सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम झाल्यावर पाकणी व सोरेगाव येथे जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी नवीन फिल्टर बेड तयार करावे लागणार आहेत.

सध्याची उजनीची जलवाहिनीची क्षमता: ११० एमएलडी आहे. प्रस्तावित योजना: ११० एमएलडीची आहे. एकरुख योजना: १५ एमएलडीची आहे. टाकळी योजना: ८० एमएलडीची आहे. अशाप्रकारे शहराला ३१५ एमएलडी पाणी दररोज उपलब्ध होईल. ज्याचा उपयोग शहराची दररोजची गरज भागण्यासाठी होऊ शकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात सोलापूर दौºयावर असताना ही योजना मार्गी लावण्याबाबत सुतोवाच केले होते. त्यादृष्टीने ही तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The technical report of the solar water pipeline of Solapur City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.