तंत्रज्ञानामुळे मराठी चित्रपटातील उत्तम कलाकृतींची निर्मिती रसिकांसमोर येतेय : अलका कुबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 04:06 PM2019-11-04T16:06:55+5:302019-11-04T16:11:13+5:30

संवाद; मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी 

Technology brings to the forefront of the creation of masterpieces in Marathi film: Alka Kubal | तंत्रज्ञानामुळे मराठी चित्रपटातील उत्तम कलाकृतींची निर्मिती रसिकांसमोर येतेय : अलका कुबल

तंत्रज्ञानामुळे मराठी चित्रपटातील उत्तम कलाकृतींची निर्मिती रसिकांसमोर येतेय : अलका कुबल

googlenewsNext
ठळक मुद्दे- प्रसिध्द अभिनेत्री अलका कबुल सोलापूर दौºयावर-  ‘बकाल’ या सिनेमाच्या कलाकारांनी आज लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली- सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बकाल’ ची टीम सोलापुरात

सोलापूर : मराठी चित्रपट आता कोणत्याही चौकटीत अडकून राहत नाहीत. तमाशापट, विनोदी सिनेमांचा काळ गेल्यानंतर मराठी रजतपटावर वैविध्य दिसत आहे. नवनवीन विषय हाताळले जात  आहेत. शिवाय तंत्रज्ञानही विकसित झालेले आहे. त्यामुळेच उत्तमोत्तम कलाकृती चित्रपट रसिकांना पाहायला मिळत आहेत, असे निरीक्षण प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना येथे नोंदविले.

कुबल त्यांचे पती आणि दिग्दर्शक समीर आठल्ये तसेच ‘बकाल’ या अगामी सिनेमच्या कलाकारांनी आज लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या  अनेक वर्षांमधील देशभरातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थित्यंतरांचं प्रभावी दर्शन आपल्या मराठी चित्रपटामधून घडलं आहे. समाज जसजसा बदलत गेला, तसतसा आपला चित्रपटही बदलत गेला. लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय, तंत्रज्ञान या सर्वच आघाड्यांवर आजचं चित्रपट बदलांचं खरं क्रेडिट लेखक मंडळींनाच द्यायला हवं. आतापर्यंतच्या काळातला आणखी एक ठळक बदल म्हणजे चित्रपटाची लांबी. पूर्वीच्या सर्वसाधारण चित्रपटाची लांबी ही अडीच तास असे. अनेक चित्रपट हे अडीच ते तीन तासांचे असत. तसेच काहींची लांबी तर तीन तासांहूनही अधिक असे. सध्या चित्रपटाचे काम थ्रीडी लूक, न्यूक, फ्युजन, आफ्टर इफेक्ट्स यासारख्या सॉफ्टवेअरवरही  करण्यात येते.

पूर्वी चित्रीकरणादरम्यान अनेक रिटेक होण्याचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे निर्मात्यांचा पैसा वाचत आहे कारण प्रत्येक रिटेकला वेगळा खर्च करावा लागत होता, तो सध्या थांबला आहे. मराठी चित्रपट रसिकांना दमदार कथानकाची आवड आहे़ रसिकांच्या आवडीनुसार मागील काही वर्षांपासून दमदार चित्रपट रसिकांच्या भेटीला आले आहेत, असे त्या म्हणाल्या.
यावेळी अभिनेता चैतन्य मेस्त्री, अभिनेत्री जुई बेंडखळे, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज आदी कलावंत उपस्थित होते. 



 

Web Title: Technology brings to the forefront of the creation of masterpieces in Marathi film: Alka Kubal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.