थेट बांधावर तहसीलदार, भाऊसाहेबांची एकच धांदल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:32+5:302021-09-13T04:21:32+5:30

तालुक्यात ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे केले जात आहे. या उपक्रमाला शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तहसीलदार बाळासाहेब ...

Tehsildar directly on the dam, Bhausaheb's only rush .. | थेट बांधावर तहसीलदार, भाऊसाहेबांची एकच धांदल..

थेट बांधावर तहसीलदार, भाऊसाहेबांची एकच धांदल..

Next

तालुक्यात ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे केले जात आहे. या उपक्रमाला शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तहसीलदार बाळासाहेब सिरसाट हे स्वतः तालुक्यातील विविध भागात पाहणी दौरे करीत आहेत. पोलीस पाटीलही हिरिरीने सहभागी आहेत. तसेच महसूल विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, महा ई सेवा केंद्र चालक, ग्रामपंचायत ऑपरेटरदेखील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणीपूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरण्यासाठी शेतकऱ्यांचीही लगबग सुरू आहे.

...तर शेतकऱ्यांचा तोटा होईल

मोबाईल ॲपवर ई पीक पेरा न नोंदल्यास आपले शेत पडीक किंवा पेरणी झालीच नाही असे दाखविले जाईल.

बँकांकडून पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होतील. प्रधानमंत्री पीक विमा योजना मिळणार नाही.

शासनाची मदत मिळणार नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी यांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे, असे तहसीलदार बाळासाहेब सिरसाट यांनी स्पष्ट केले.

----

फोटो

सदलापूर येथील शिवारात पीक पेरा मोबाईल ॲपवरून कसा नोंदवायचा याची माहिती देताना तहसीलदार बाळासाहेब शिरसाट.

Web Title: Tehsildar directly on the dam, Bhausaheb's only rush ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.