Breaking; सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधिक्षकपदी तेजस्वी सातपुते

By Appasaheb.patil | Published: October 7, 2020 05:10 PM2020-10-07T17:10:25+5:302020-10-07T17:35:27+5:30

सोलापूर आॅनलाइन ब्रेकींग

Tejaswi Satpute as Superintendent of Police of Solapur Rural Police Force | Breaking; सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधिक्षकपदी तेजस्वी सातपुते

Breaking; सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधिक्षकपदी तेजस्वी सातपुते

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधिक्षकपदी सातारा येथून तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सातपुते यांची बदली करण्यात आली आहे. बुधवारी भारतीय पोलिस सेवेतील पोलीस अधिक्षक/पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केल्या आहेत. 

२००९ साली त्यांनी  स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. आपली आवड ओळखून त्यांनी मराठी आणि इतिहास हे विषय मुख्य परीक्षेसाठीं निवडले. पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यश हुकलं. दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्थेत त्यांची निवड झाली.   दुसऱ्या प्रयत्नात  २०१२ साली देशात १९८ क्रमांक मिळवून त्या आय पी एस झाल्या.यु. पी. एस.सी परिक्षेत यश संपादन केल्यावर त्यांच लग्न त्यावेळी दिल्ली स्थित असलेल्या किशोर रक्ताटे यांच्या सोबत झाले. किशोर रक्ताटे त्यावेळी केंद्रीय नियोजन आयोगात नोकरीस होते. निकालानंतर प्रशिक्षणाच्या दरम्यान जो दोन ते तीन महिन्याचा कालावधी होता तेवढा काळ प्रपंच सांभाळला. आॅगष्ट २०१२ ला त्या मसुरीत प्रशिक्षणासाठी गेल्या.

तिथं १०० दिवस त्यांचा फौडेशन कोर्स पुर्ण झाल्यावर  हैद्राबाद येथील  प्रख्यात वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीत  पुढील प्रशिक्षण झालं .हे प्रशिक्षण साधारण डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१४ या कालावधीत त्यांनी पुर्ण केलं . या प्रशिक्षणात देखिल त्यांनी मॊठं यश मिळवलं. या प्रशिक्षणात पोलिसांच्या नेतृत्वावर आधारीत होणार्‍या लेखी परिक्षेतील स्पर्धेच्या त्या मानकरी ठरल्या. अतिशय खडतर प्रशिक्षण आटोपून त्या महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाल्या.  फेब्रुवारी २०१४ ते सप्टेंबर २०१४ या काळात परिविक्षाधीन कालावधी त्यांनी जळगाव येथे पूर्ण केला. याच काळात त्यांनी बाळंतपणासाठी सुट्टी घेतल्याने त्यांचा परीविक्षाधिन कालावधी जळगाव अन जालना अशा दोन जिल्ह्यात पुर्ण करावा लागला.

त्यानंतर त्यांची  नेमणूक जालना जिल्ह्यातील परतूर येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून झाली. तिथे त्या डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१६ दरम्यान होत्या. नंतर त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागात पोलीस अधीक्षक  म्हणून झाली. या नेमणूकीच्या काळात त्यांच्याकडे ज्या जबाबदार्‍या होत्या. गुप्तचर विभागातुन त्यांची बदली झाली पुणे ग्रामीणला. पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणुन त्या सव्वा वर्ष कार्यरत  होत्या. नंतर पुणे शहर पोलीस दलात त्यांची नेमणूक उपायुक्त ( वाहतूक) या पदावर झाली. फेब्रुवारी २०१९ पासून त्या जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा म्हणून कार्यरत आहेत.   आतापर्यंतच्या प्रत्येक नेमणूकीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

Web Title: Tejaswi Satpute as Superintendent of Police of Solapur Rural Police Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.