टेंभुर्णीकरांचा कडकडीत बंद, व्यापारपेठाध्ये शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:23+5:302020-12-09T04:17:23+5:30
टेंभुर्णी : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यास विरोध करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ...
टेंभुर्णी : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यास विरोध करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत टेंभुर्णी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यावसायिक व व्यापारी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
शेतकरी आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी टेंभुर्णी शहरातील बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहिले. मार्केटयार्डमधील ईतर दुकानेही बंद ठेवली गेली. मार्केट यार्ड परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. याशिवाय शहरातील कुर्डूवाडी बायपास चौक, करमाळा चौक, अकलूज चौक, मेन रोड, टिळक रोड या सर्व ठिकाणची दुकाने बंद ठेवून शेतकरी आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. आज दिवसभर येथील कापड दुकाने, सराफ दुकाने याचबरोबर किराणा दुकान, हॉटेल, चहाच्या टप-या, मशनरी दुकाने, स्टेशनरी दुकाने दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. या बंदमुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट होता. बंद शांततेत पार पडला.
फोट : ०८ टेंभुर्णी
शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी टेंभुर्णी मार्केट यार्ड मध्ये व्यापा-यांनी कडकडी बंद पाळला.