माढा तालुक्यात तापमानात वाढ, सकाळपासूनच रस्ते पडू लागले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:36+5:302021-04-01T04:23:36+5:30
थंडावा मिळण्यासाठी थंडपेयाची विक्री वाढत आहे. एकीकडे कोरोना अन् दुसरीकडे उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करणे सर्वसामान्यांना सध्या आवश्यक व फायद्याचे ...
थंडावा मिळण्यासाठी थंडपेयाची विक्री वाढत आहे. एकीकडे कोरोना अन् दुसरीकडे उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करणे सर्वसामान्यांना सध्या आवश्यक व फायद्याचे ठरणार आहे.
३१ मार्चपर्यंत कमाल तापमान सरासरी ३८ अ. सें. पर्यंत राहिले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक सकाळीच दिवसभराचे नित्यनियम उरकत आहेत. सध्या घराघरातील कुलर व एसी कायमस्वरूपी सुरू झाल्याचे सगळीकडे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात डेरे खरेदी करण्यासाठी कुर्डूवाडी, मोडनिंब, माढा व टेंभुर्णी शहरातील दुकानांत गर्दी करत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांतून सायंकाळच्या प्रवासाला सध्या पसंती दिली जात आहे. या कडक उन्हाचा फटका वाहनचालकांवर होत असून दुपारच्या उन्हापासून वाचण्यासाठी अनेक वाहनचालक हे दुपारी आपली वाहने सावलीच्या ठिकाणी लावून बसत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक व्यवसायावर दैनंदिन परिणाम होत आहे.
----