भक्तनिवास येथील रूम का देत नाही म्हणून मंदिर समितीच्या कर्मचाºयास पंढरपुरातील पुढाºयाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 03:10 PM2019-01-28T15:10:54+5:302019-01-28T15:12:41+5:30
पंढरपूर : पदाधिकाºयांना व मित्रमंडळींना राहण्यासाठी वेदांत भक्तनिवास येथील रुम का देत नाही? असा सवाल करीत एका राजकीय स्थानिक ...
पंढरपूर : पदाधिकाºयांना व मित्रमंडळींना राहण्यासाठी वेदांत भक्तनिवास येथील रुम का देत नाही? असा सवाल करीत एका राजकीय स्थानिक पुढाºयाने मंदिर समितीच्या कर्मचाºयाला शिवीगाळ करून मारहाण केली आहे. ही घटना २६ जानेवारी रोजी रात्री घडली़ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाºयाला पुढाºयाकडून शिवीगाळ व मारहाण करण्याची ही दुसरी घटना आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे महाराष्टÑाची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. यामध्ये व्हीआयपी भाविकांचाही समावेश असतो़ यामुळे पंढरपुरातील स्थानिक पदाधिकाºयांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाºया वरिष्ठ पदाधिकाºयांची सोय करावी लागते. इतकेच नाही तर निवासाची, जेवणाची व विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या व्हीआयपी दर्शनाची सोय करावी लागते.
वरिष्ठ पदाधिकाºयांसमोर आपण किती कार्यक्षम आहोत, याच्या नादात मंदिरातील अधिकारी व कर्मचाºयांबरोबर राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाºयांचे खटके उडतात.
अशातच मागील काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या शहराध्यक्षाने मंदिरातील कर्मचारी व अधिकाºयांना शिवीगाळ केली होती. मात्र शनिवारी पदाधिकाºयांना व मित्रमंडळींना राहण्यासाठी वेदांत भक्तनिवास येथील रुम का देत नाही? म्हणून एका राजकीय स्थानिक पुढाºयाने मंदिर समितीच्या कर्मचाºयाला शिवीगाळ करून मारहाण केली़ याबाबत त्या कर्मचाºयाने वरिष्ठ अधिकाºयांना माहिती दिली, परंतु घाबरून संबंधित पुढाºयाविरोधात तक्रार दाखल केली नाही़