बारपेक्षाही कमी गर्दी तरीही मंदिरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:41+5:302021-08-18T04:28:41+5:30

दिवंगत माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त फडणवीस पंढरपुरात आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

Temples closed even less crowded than the bar | बारपेक्षाही कमी गर्दी तरीही मंदिरे बंद

बारपेक्षाही कमी गर्दी तरीही मंदिरे बंद

Next

दिवंगत माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त फडणवीस पंढरपुरात आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार रणजित निंबाळकर खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार विजय देशमुख उपस्थित होते.

पुढे फडणवीस म्हणाले, हिंदूंचे ३३ कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरं उघडा. मंदिरे बंद ठेवणे ही सरकरची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता. मात्र, मंदिरे बंद ठेवता.

----

शाळांबाबतही सरकार गोंधळलेले

शाळांच्या बाबतही राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. शाळेबाबत धरसोड धोरण न ठेवता एक निश्चित धोरण राबविल्यास पालक आणि विद्यार्थी संभ्रमात राहणार नाहीत असे फडणवीस यांनी सांगितले.

---

Web Title: Temples closed even less crowded than the bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.