राज्यातील मंदिरे लवकरच उघडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:57 AM2020-09-01T04:57:37+5:302020-09-01T04:57:54+5:30

मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली.

Temples in the state will open soon; Assurance of the Chief Minister, Prakash Ambedkar's agitation in Pandharpur | राज्यातील मंदिरे लवकरच उघडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात आंदोलन

राज्यातील मंदिरे लवकरच उघडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात आंदोलन

googlenewsNext

पंढरपूर (जि. सोलापूर): राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली. गेल्या ५ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल मंदिर अखेर उघडण्यात आले. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे लवकर उघडण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी सरकारने १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. १० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मंदिरे खुली करण्याचा मुद्दा हाती घेऊन वंचितने हिंदुत्व पकडले का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला. यानंतर आंबेडकर काही सेकंद थांबले. ‘महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही गुरू मानतो. या तिघांनी कधीही धर्म नाकारला नाही. धर्म अविभाज्य अंग आहे, अशीच त्यांची भावना होती, असे ते म्हणाले.
 

Web Title: Temples in the state will open soon; Assurance of the Chief Minister, Prakash Ambedkar's agitation in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.