Breaking; सोलापुरातील मंदिरे, पर्यटनस्थळे, क्रीडांगणे राहतील सुरू राहतील पण...
By appasaheb.patil | Published: February 24, 2021 05:54 PM2021-02-24T17:54:10+5:302021-02-24T17:54:17+5:30
सोलापुरात रात्रीची संचारबंदी; पालकमंत्र्यांनी दिली माहिती...
सोलापूर - सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
दरम्यान, ७ मार्चपर्यंत मंदिरे, पर्यटनस्थळे, क्रीडांगणे सुरू राहतील. मात्र याठिकाणी शासकीय नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 7 मार्च 2021 पर्यंत मंदिराच्या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच क्रीडांगणे ही केवळ मॉर्निंग वॉकच्या वापरासाठी असणार आहेत. याठिकाणी स्पर्धा, मुलांना खेळण्यास परवानगी नसणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
सोलापूरकरांनो लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियमांचे पालन करा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची काळजी घ्या, मास्कचा वापर करा. सॅनिटायझर, साबणाने हात धुवा, गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन भरणे यांनी केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव यांनी ग्रामीण भागातील कोरोनाच्या स्थितीचे सादरीकरण केले तर मनपा आयुक्त शिवशंकर यांनी शहरची स्थिती मांडली. बैठकीला राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या अधिष्ठाता शुभलक्ष्मी जयस्वाल, लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.