टेम्पो आडवा ९८ हजारांचा ऐवज लुटला; अज्ञात चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:11+5:302021-06-26T04:17:11+5:30
याबाबत आशयर टेम्पोचालक बळिराम बामणे (वय २७,रा. धाकलगाव, जि.जालना) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे त्यावरून अज्ञात चौघा चोरट्यांविरोधात ...
याबाबत आशयर टेम्पोचालक बळिराम बामणे (वय २७,रा. धाकलगाव, जि.जालना) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे त्यावरून अज्ञात चौघा चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हा टेम्पोमालक व चालक असून तो आपल्या टेम्पो (एमएच-२१, एक्स -९१११) जालना येथून कोल्हापूरला कापसाच्या गाठी भाड्याने घेऊन गेला होता. तेथून परत गावाकडे येताना त्याला इन्व्हर्टर व गाड्याच्या वेगवेगळ्या साईजच्या बॅटरीज पोहोच करण्याचे भाडे मिळाले. ते भाडे घेऊन जयसिंगपूरहून गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास केजकडे जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास रोपळे (ता पंढरपूर) येथे फिर्यादीने चहा पिण्यासाठी आपला टेम्पो थांबविला. तेथून कुर्डूवाडीच्या दिशेने येत असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाची जीपने त्याचा पाठलाग केला. पडसाळी हद्दीत टेम्पोच्या पुढे येऊन आडवी थांबविली.
यावेळी पहाटे तीन ते साडेतीन वाजलेले होते. त्या जीपमधील अज्ञात चौघे खाली उतरले. त्यांनी चालकाला पैशांची मागणी करून दमबाजी केली. त्यातील एकाने काठीने मारहाण केली, दोघांनी खिसे तपासले. यावेळी जवळचा ८ हजारांचा मोबाईल, लहान चार बॅटऱ्या- २० हजार रुपये,मध्यम आकाराच्या ७ हजार रुपयांच्या ७ बॅटऱ्या असे ४९ हजार रुपये, व मोठी एक बॅटरी १४ हजार रुपये आणि ७ हजार रुपये रोख असा एकूण ९८ हजार रुपयांचा ऐवज त्यांनी यादरम्यान लुटला.
पुढील तपास पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.
----
चोरटे मराठी भाषिक
यावेळी चोरटे हे मराठीत बोलत होते. घडलेल्या घटनेनंतर फिर्यादीने प्रथम त्याच्या भावाला घटना सांगतली. त्यानंतर कुर्डूवाडी पोलिसांत त्या चौघांविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहनचालकांत भीतीने खळबळ उडाली आहे.