वडाच्या पूजेनंतर फेरे घेताना सेल्फीचा मोह आवरला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:46+5:302021-06-26T04:16:46+5:30
हिंदू धर्मातील महिलांचा महत्त्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण. सलग दोन वर्षे वटपौर्णिमा कोरोनाच्या सावटाखाली साजरी ...
हिंदू धर्मातील महिलांचा महत्त्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण. सलग दोन वर्षे वटपौर्णिमा कोरोनाच्या सावटाखाली साजरी होत आहे. गुरुवारी सकाळपासूनच सुवासिनी महिलांनी तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करीत जेथे वड वृक्ष आहे तेथे जाऊन सात जन्मासाठी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करून परंपरा जोपासली.
सांगोला शहरातील महिलांनी घरासमोर, श्री मायाक्का देवी मंदिर, शासकीय विश्रामगृह, महूद रोडवरील संतोष गुळमिरे यांच्या घराशेजारी, तर ग्रामीण भागातील वडाच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी महिलांनी तेथे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन एकमेकींचे ओटीभरण केले. ग्रामीण भागात महिलांनी वडाचे झाड लावून पुढील वर्षापर्यंत त्याचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला.
फोटो ओळ :::::::::::::::
सांगोला शहरातील सुवासिनी महिलांनी महूद रोडवर असलेल्या वडाची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती त्याचे हे छायाचित्र.