कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दहा दिवसांच्या बाळंतिणीला ‘सिव्हिल’मध्ये बसविले दिवसभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:53 PM2020-05-06T14:53:07+5:302020-05-06T14:55:00+5:30

सोलापूर शासकीय रूग्णालयातील अजब प्रकार; तब्बल साडेसहा तासांनंतर करून घेतले दाखल; महिलेचे झाले हाल !

A ten-day-old baby who was positive for corona was placed in a 'civil' room all day | कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दहा दिवसांच्या बाळंतिणीला ‘सिव्हिल’मध्ये बसविले दिवसभर

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दहा दिवसांच्या बाळंतिणीला ‘सिव्हिल’मध्ये बसविले दिवसभर

Next
ठळक मुद्देपाच्छा पेठेतील एक महिला प्रसूतीसाठी दि.२४ एप्रिल रोजी शासकीय रूग्णालयात दाखल झाली होतीप्रसूती झाल्यानंतर तिला दि.२८ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आलामहिलेला सोडून चालक निघून गेला. मात्र तेथील डॉक्टरांनी महिलेला अ‍ॅडमिट करून घेण्यास नकार दिला

संताजी शिंदे 
सोलापूर : अवघ्या दहा दिवसांच्या बाळंतिणीला केगाव येथील क्वारंटाइन विभागात ठेवल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आत घेण्यास नकार दिला, दिवसभर बाहेर बसविले. तब्बल साडेसहा तासांनंतर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बाळंतिणीला  आत घेऊन अ‍ॅडमिट केल्याचा धक्कादायक प्रकार  घडला.

पाच्छा पेठेतील एक महिला प्रसूतीसाठी दि.२४ एप्रिल रोजी शासकीय रूग्णालयात दाखल झाली होती़ त्या दिवशी तिला मुलगी झाली. प्रसूती झाल्यानंतर तिला दि.२८ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. महिला घरी आली, मात्र तिच्या मोठ्या बहिणीला कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यामुळे संपर्कातील नातेवाईकांमध्ये बाळंत झालेली महिला, तिचा पती, दीड वर्षाचा मुलगा व नुकतेच जन्मलेले पाच दिवसांचे बालक व दीर अशा पाच लोकांना अ‍ॅम्ब्युलन्समधून दि.१ मे २0२0 रोजी केगाव येथील क्वारंटाइन विभागाने नेले.

क्वारंटाइन विभागात सर्वांचे स्वॅब घेण्यात आले़ त्यांचा अहवाल दि.५ मे रोजी सकाळी प्राप्त झाला़ त्यात महिलेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अहवाल पाहताच बाळंत झालेल्या महिलेला सकाळी १0.३0 वाजता अ‍ॅम्ब्युलन्समधून शासकीय रूग्णालयात आणले. महिलेला सोडून चालक निघून गेला. मात्र तेथील डॉक्टरांनी महिलेला अ‍ॅडमिट करून घेण्यास नकार दिला. तुला इथे कोण आणले आहे, त्यांना येऊ दे, मग बघू, असे म्हणाले. महिलेला दहा दिवसांच्या बाळासह रूग्णालयातून बाहेर जाऊन बसण्यास सांगितले.

महिला व तिच्यासोबत १0 दिवसांचे बाळ, मोबाईल नाही, पती व दीड वर्षाचे मुल केगावच्या क्वारंटाइन विभागात, फोन कोणाला करावं कळेना. आपल्याला कोरोना झाला आहे, आता आपलं काय होणार? या भीतीने महिला ए-ब्लॉकसमोर असलेल्या दगडी भिंंतीच्या बाजूला दहा दिवसांच्या बाळाला पोटाला लावून बसली. जाणाºया-येणाºया व्यक्तीला मोबाईलसाठी विनंती करत होती. एका व्यक्तीने नातेवाईकाचा नंबर विचारला. नंबर डायल करून स्पीकर आॅनवर तिला नातेवाईकाला बोलण्यास दिले. संचारबंदीमुळे नातेवाईकांनाही रूग्णालयात येता येत नव्हते. दहा दिवसांच्या बाळंतिणीने  संपूर्ण दिवस भिंंतीच्या कडेला काढला.बाळंतिणीचे मामा रूग्णालयात आले, त्यांनी विचारणा केली तेव्हा कोणी प्रतिसाद देत नव्हते. मामाने रूग्णालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांना पोलिसांकडून काठीने झोडपण्यास सांगितले. तुझ्या नातेवाईकास घरी घेऊन जा, अशी उर्मट भाषा मामाला वापरण्यात आली.

महिलेला जाणीवपूर्वक लक्ष्य केले : फणीबंद
- कोरोना विभागातील रूग्णांना देण्यात येणारे अन्न कोणत्या प्रतीचे आहे, हे मी दि.२ मे रोजी मीडियाच्या माध्यमातून दाखवले होते. बहुतेक याचा राग मनात धरून त्या महिलेला शासकीय रूग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष्य केले आहे, असे मला वाटते. केगाव येथील डॉक्टरांनी ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे असे सांगितले होते, तरीही तिच्यासोबत शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी असे वर्तन केले. तेथील डॉक्टराने आपले पितळ उघडे पडते म्हणून कोरोना पॉझिटिव्ह असलेली दहा दिवसांची बाळंतीण महिला पळून गेली, असा आरोप लावला. महिला कोरोना पॉझिटिव्ह असताना तिला बाहेर काढले, ही बाब किती गंभीर आहे. बाळंतीण महिला जर पळून गेली असती तर मग ती शासकीय रूग्णालयात रस्त्याच्या कडेला दहा दिवसांच्या बाळाला उघड्यावर घेऊन बसली असती का? असा सवाल बाबुलाल फणीबंद यांनी केला. 

रूग्ण दाखल झाल्यानंतर त्याची जी रितसर कार्यवाही असते ती पूर्ण झाली नसेल. त्यामुळे काही वेळ झाला असेल. या प्रकाराची मला कल्पना नाही. मात्र मी याची माहिती घेऊन काय झाले होते ते पाहतो. 
-डॉ. औदुंबर मस्के, अधीक्षक, शासकीय रुग्णालय.

Web Title: A ten-day-old baby who was positive for corona was placed in a 'civil' room all day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.