तीन ज्वेलर्स दुकानातून दहा लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:40+5:302021-07-31T04:23:40+5:30

दुकानातील ७ लाख ६१ हजार ७८५ रूपये किमतीचे १४ किलो २३७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू, १ लाख ६२ हजार ...

Ten lakh stolen from three jewelers shop | तीन ज्वेलर्स दुकानातून दहा लाखांची चोरी

तीन ज्वेलर्स दुकानातून दहा लाखांची चोरी

Next

दुकानातील ७ लाख ६१ हजार ७८५ रूपये किमतीचे १४ किलो २३७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू, १ लाख ६२ हजार रूपये किमतीचे ३६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वस्तू, ५३ हजार ९१० रूपये रोख रक्कम असा ९ लाख ८७ हजार ६९५ रूपयांच्या मुद्देमालाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरूद्ध वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

अनिल लिंबाजी आसबे यांच्या कस्तुरबा कॉम्प्लेक्स येथे राजलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान व महालक्ष्मी कलेक्शन नावाचे कापड्याचे दुकान आहे. काउंटरमध्ये ठेवलेले १३ हजार ७५० रूपयांचे २५० ग्रॅमचे चांदीचे वाळे, ५५ हजार रूपयांचे पैजण, १३ हजार ७५० रूपयांचे २५० ग्रॅम वजनाचे ब्रासलेट, ७५ हजार रूपयांची मोडीची चांदी, १० हजार रूपयांचा सीसीटीव्ही सीडीआर चोरीला केली. तसेच १० हजार ९१० रूपयांची चोरी केली. गल्ल्यात ठेवलेले रोख १० हजार ९१० रूपये असा १ लाख ७८ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

परशुराम निवृत्ती नळ यांच्या लक्ष्मी ज्वेलर्सच्या शटरच्या दोन्ही बाजूच्या पट्ट्या व सेंटर लॉक अज्ञात चोरट्याने तोडून १ लाख ६२ हजार रूपये किमतीचे ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ६ लाख ४ हजार २८५ रूपयांची ११ किलो २३७ ग्रॅम वजनाची चांदी व रोख ४० हजार रूपये चोरट्यांनी चोरून नेले. प्रमोद मोहन क्षीरसागर यांच्या विरभद्र ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाच्या शटरच्या पट्ट्या व शटर लॉक तोडून दुकानातील रोख तीन हजार रूपये अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

Web Title: Ten lakh stolen from three jewelers shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.