अठ्ठावीस लाख रुपयांच्या गुटख्यासह दहा लाखाची वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:49+5:302021-09-21T04:24:49+5:30
अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी प्रवीण दत्तात्रय खांडेकर व चेतन दत्तात्रय खांडेकर (रा. निजामपूर, ...
अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी प्रवीण दत्तात्रय खांडेकर व चेतन दत्तात्रय खांडेकर (रा. निजामपूर, ता. सांगोला), बाबू धुळा काळे (रा. खैरणे, ता. जत, जि. सांगली), माल पुरवठादार बिपीन तेजवानी (रा.अथणी-कर्नाटक), साठा मालक दत्तात्रय खांडेकर (रा.कोथरुड-पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, सहायक पोलीस निरीक्षक राजुलकर, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस नाईक गणेश मेटकरी, पोलीस काॅन्स्टेबल संभाजी काशीद हे रविवारी रात्री सांगोला-महुद रोड पेट्रोलिंग करत होते. त्यांनी एखतपूर पाटीजवळ सांगोल्याकडून भरधाव येणाऱ्या एमएच १२/ एलटी-४३२८ हा पिकअप थांबवून चालकाकडे चौकशी केली. त्याने कर्नाटक (अथनी) येथून पुण्याकडे गुटखा घेऊन निघाल्याचे सांगितले. पोलिसांनी पिकअपची तपासणी केली असता, हौद्यात प्रतिबंधित अन्नपदार्थ सुगंधित पान मसाला तंबाखू असा १५ लाख १३ हजार १२० रुपयांचा गुटखा मिळून आला.
अन्न व भेसळ प्रशासन सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी अ.वाय. इलागोर व अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांच्या पथकाने याच रोडवरील वाकी-शिवणे (ता. सांगोला) येथे एमएच १२/ एसएक्स १२४० या टेम्पोतून १३ लाख २४ हजार २४० रुपयांचा गुटखा अश्या दोन कारवाईत सुमारे २८ लाख ३७ हजार ३६० रुपयांच्या गुटख्यासह १० लाख रुपयांची दोन वाहने असा सुमारे ३८ लाख ३७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.