डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी दहा ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:22 AM2021-05-11T04:22:41+5:302021-05-11T04:22:41+5:30
माढा : ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या प्रयत्नातून दहा ऑक्सिजन सिलिंडर कारखान्याकडून उपलब्ध ...
माढा : ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या प्रयत्नातून दहा ऑक्सिजन सिलिंडर कारखान्याकडून उपलब्ध करून देण्यात आले. तसेच हेल्थ केअर सेंटरसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री व औषधे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती माढा नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते राजू गोटे यांनी दिली.
माढा परिसरातील लोकांना कोरोना काळात ऑक्सिजन बेडची सुविधा व्हावी म्हणून माढा ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे.
सध्या या ठिकाणी वीस ऑक्सिजन व दहा आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. आतापर्यंत ४९ रुग्ण दाखल झाले असून, १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सात रुग्णांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात दाखल होण्यास सांगितले आहे.
सध्या २० ऑक्सिजन बेड व दहा आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवू नये म्हणून बबनराव शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रिज या कारखान्याकडून १० ऑक्सिजन सिलिंडर दिली आहेत. यासाठी माजी झेडपी सदस्य झुंजार भांगे, नगरपंचायतीतल गटनेते सुभाष जाधव, दत्ता आंबुरे यांनी पाठपुरावा केला.
---
फोटो :
माढा ग्रामीण रुग्णालयात राजू गोटे, डाॅ. सदानंद व्हनकळस यांनी ऑक्सिजन सिलिंडर दिले.