दहा हजारांची वाळू अन्‌ चार लाखांचा ट्रॅक्टर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:15 AM2021-06-23T04:15:46+5:302021-06-23T04:15:46+5:30

फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि. २१) रात्री ११.३० वाजता पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा वाळू (गौण ...

Tens of thousands of sand and four lakh tractors were seized | दहा हजारांची वाळू अन्‌ चार लाखांचा ट्रॅक्टर पकडला

दहा हजारांची वाळू अन्‌ चार लाखांचा ट्रॅक्टर पकडला

Next

फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि. २१) रात्री ११.३० वाजता पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा वाळू (गौण खनिज) वाहतुकीवर कारवाईसाठी खासगी वाहनाने कोर्टी व रावगाव बीटमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीनुसार पोथरे येथील सीना नदीमधून एक ट्रॅक्टर-ट्राॅली वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खासगी वाहनाने पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा पोथरे ते ढेकळेवाडी वस्तीच्या कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टर व ट्राॅलीचा पथकाला संशय आल्याने चालकाला ट्रॅक्टरसह पकडले. तेव्हा रवींद्र झिंझाडे व महेश झिंझाडे हे संशयित वाळू वाहतूक करताना सापडले.

त्यांच्याकडील चार लाखांचा एक ट्रॅक्टर व दोनचाकी ट्रेलरसह १० हजारांची एक ब्रास वाळू (गौण खनिज) करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास रवींद्र झिंझाडे व महेश झिंझाडे यांच्याविरुद्ध अवैधरीत्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे कृत्य करून शासकीय गौण खनिज वाहतूकप्रकरणी पर्यावरण संवर्धन अधिनियम कायदा १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हा नोंदला आहे.

Web Title: Tens of thousands of sand and four lakh tractors were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.