टेंभुर्णी येथे धाडसी दरोडा, एका बंदुकासह १० काडतुसे चोरी, पोलीसांचा तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 02:44 PM2018-01-16T14:44:03+5:302018-01-16T14:45:43+5:30

मागील वषार्पून झालेल्या  एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश आलेले नाही. या मुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीच्या अनेक घटनांची नोंद करण्यासही पोलीस टाळाटाळ करत असल्यांची लोकांची तक्रार आहे.

Terror strike in Tembhurni, 10 cartridges with a gun, police investigation started | टेंभुर्णी येथे धाडसी दरोडा, एका बंदुकासह १० काडतुसे चोरी, पोलीसांचा तपास सुरू

टेंभुर्णी येथे धाडसी दरोडा, एका बंदुकासह १० काडतुसे चोरी, पोलीसांचा तपास सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देटेभुर्णी शहरातही दर आठ-दहा दिवसाला चोरीच्या लहान मोठ्या घटना घडत आहेत मागील वषार्पून झालेल्या  एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश

आॅनलाइन लोकमत सोलापूर
टेंभुर्णी दि १६ : टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हेरगाव (ता.माढा) येथील वस्तीवर राहणाºया मनोहर वागज व दत्तात्रय भरगंडे यांच्या घरावर धाडसी दरोडा टाकला़ या धाडीत अज्ञात चार चोरट्यांनी दहा काडतुसासह एक बंदुक व  सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे मिळून ६५ हजार रूपयांचा मुदेमाल चोरून नेला आहे. ही घटना  सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.
सदर घटनेची फिर्याद मनोहर विठोबा वागज यांनी टेभुर्णी पोलिस ठाण्यात दिली आहे़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मनोहर वागज यांना शेजारी राहणाºया दतात्रेय भरगंडे यांच्या  घराच्या पत्र्याचा आवाज आला, म्हणून वागज यांनी भरगंडे यांना आवाज दिला परंतु भरगंडे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही़ यानंतर  वागज यांनी घराचा दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद केला होता. वागज यांनी पुन्हा शेजारी राहणाºया मुलास फोन लावला परंतु तो झोपेत असल्याने त्याने फोन घेतला नाही. वागज यांनी पुन्हा भरगंडे यांना आवाज दिला तेव्हा भरगंडे आलो आलो  म्हणाले व त्यांनी वागज यांच्या घराचा दरवाजा उघडला याचवेळी दबा धरून बसलेल्या चार चोरट्यांनी वागज यांच्या घरात प्रवेश केला. एकाने वागज यांना दम  देवून दागिने व पैसे कोठे आहेत याची चौकशी केल़ बाकीच्या तिघांनी घरात पैसे व दागिन्यांची शोधाशोध चालू केली़ यावेळी चोरटयांनी वागज यांच्या कपाटातील दहा हजार रुपये रोख रक्कम,पत्नीच्या गळयातील दहा ग्रॅमचे मणीमंगळसूत्र व चार ग्रामचे कानातील सोन्याची फुले , बारा बोअरची बंदूक,  दहा काडतूसे असा एकूण ५५हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला.
जाताना चोरांनी वागज पती पत्नी व दत्तात्रय भरगंडे यांना घरास बाहेरूण कडी लावून कोंडून ठेवले. नंतर आरडा ओरडा झाल्यावर भरगंडे यांच्या रेष्मा नावाच्या मुलीने वागज यांच्या घराची कडी काढून वागज पती पत्नि व भरगंडे यांची सुटका केली.
 यानंतर भरगंडे यांनी सांगीतले की त्या चार चोरट्यांनी आगोदर आनच्या घरात प्रवेश केला  व मला दगडाने डोक्यात मरून जखमी केले.पँटच्या खिशातील५०००रू. रोख, पत्निच्या गळ्यातील पाच ग्रॉंमचे मनीमंगळसूत्र असे एकूण १५००० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
मागील आठवड्यात टेंभुर्णी  येथे टायरचे शोरूम फोडून चार लाखाची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी आतातर बंदूकच पळवून नेल्याने टेंभुर्णी शहर व परीसरात भितिचे वातावरण पसरले आहे. टेभुर्णी शहरातही दर आठ-दहा दिवसाला चोरीच्या लहान मोठ्या घटना घडत आहेत. मागील वषार्पून झालेल्या  एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश आलेले नाही. या मुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीच्या अनेक घटनांची नोंद करण्यासही पोलीस टाळाटाळ करत असल्यांची लोकांची तक्रार आहे.

Web Title: Terror strike in Tembhurni, 10 cartridges with a gun, police investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.