भगवंताच्या दारी आधी चाचणी मग दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:21 AM2021-03-25T04:21:31+5:302021-03-25T04:21:31+5:30

सोमवारी शहरात ६८७ आणि ग्रामीण भागात ६८० ॲन्टिजेन तर ५१४ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. मंगळवारी शहरात १०५६ ...

Test before God's door then darshan! | भगवंताच्या दारी आधी चाचणी मग दर्शन!

भगवंताच्या दारी आधी चाचणी मग दर्शन!

Next

सोमवारी शहरात ६८७ आणि ग्रामीण भागात ६८० ॲन्टिजेन तर ५१४ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. मंगळवारी शहरात १०५६ आणि ग्रामीण भागात ५०१ अशा १५५७ ॲन्टिजेन चाचण्या केल्या. दोन दिवसात ५५ जण उपचारानंतर बरे झाले. आनंदाची बाब म्हणजे दोन दिवसात एकही मृत्यू नाही.

शहरात अलीपूर रोड, सुभाषनगर, उपळाई रोड, नाईकवाडी प्लॉट, भीमनगर आदी भगत जास्त रुग्ण सापडले. तर वैराग, खांडवीमध्ये जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

बार्शीत कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन दक्ष झाले आहे. यासाठी ८ मार्च रोजी प्रत्यक्ष व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन मालक व कामगार यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

या १५ दिवसात एकूण ४५५३ जणांच्या चाचण्या केल्या. त्यात ९८ जण पॉझिटिव्ह आढळले. तर इतर सेंटरर, ग्रामीण रुग्णालय याठिकाणीही चाचण्या घेतल्या जात आहेत. हाय रिक्स मधील नागरिकांचीही चाचणी घेतली जात आहे. यामुळेच रुग्ण संख्या वाढत आहे. मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड हे सातत्याने आढावा घेत आहेत.

ॲन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढवले.

मागील आठवड्यात प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी बार्शीत ॲन्टिजेन टेस्ट वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे चाचण्यांची संख्याही वाढली आहे. सोमवारी ॲन्टिजेन आणि आरटिपीसीआर मिळून १६८३ तर मंगळवारी १७४६ तपासण्या केल्या आहेत.

भगवंत मंदिरासमोर ४८५ चाचण्या; २७ बाधित

भागवत मंदिराच्या प्रवेशद्वारावरही तपासणी शिबीर सुरू केले आहे. यात ४ दिवसात ४८५ टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये २७ जण पॉझिटिव्ह निघाले असल्याचे तुषार खडके यांनी सांगितले.

----

Web Title: Test before God's door then darshan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.