स्वामीभक्ताकडून ५० ऑक्सिजन बेड देण्याची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:07+5:302021-04-30T04:28:07+5:30
अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृह येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश सूयवंशी, फतेसिंह शिक्षण संस्था ...
अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृह येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश सूयवंशी, फतेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मारुती बावडे, डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. प्रदीप घिवारे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. विपूल शहा, डॉ. प्रमोद मजगे, डॉ. गिरीश साळुंखे, माणिक बिराजदार, शिवराज स्वामी यांनी बैठक घेऊन रुग्णसेवेसाठी कार्य करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध क्षेत्रांतील लोकांशी संपर्क साधला त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यात पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी ५० ऑक्सिजन बेड देण्याचे मान्य करून वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांच्या श्री स्वामी समर्थ महाराज रुग्णालयात हे बेड दिले जाणार आहेत. डॉ. मनोहर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा केली जाणार आहे. याकामी शिवाजी मानकर आणि दत्ता सागरे यांचे सहकार्य मिळाले.