वडाळ्यात ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ अभियानात १०१ जणांची टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:37 AM2020-12-12T04:37:48+5:302020-12-12T04:37:48+5:30
‘माझे गाव, माझी जबाबदारी’ कोरोनामुक्त या अभियान योजनेंतर्गत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. वडाळ्यामध्येही हे अभियान ...
‘माझे गाव, माझी जबाबदारी’ कोरोनामुक्त या अभियान योजनेंतर्गत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. वडाळ्यामध्येही हे अभियान राबविण्यात आले. प्रथमतः सोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम साठे यांनी आपली स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली. यानंतर व्यवसायधारक व ग्रामस्थांनी स्वत: टेस्ट करून घेतली.
कळमणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बारसोळे यांनी या टेस्ट करून घेतल्या. यावेळी प्रताप पाटील, दिनेश साठे, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, व आशा सेविका विद्या टेकाळे, अर्चना अडगळे, संजीवनी गाडे, साधना व्होनशेटी, दीपाली लामकाने आदी उपस्थित होते.
----
कोट :
वय वर्षे ७९ आहे. जनसंपर्कात असूनही मला कोरोनाची बाधा झाली नाही. कारण मी नियमितपणे व्यायाम करतो. सात्त्विक सकस आहार घेतो व नियमाचे पालनही करतो. सर्वांनी असेच राहून कोरोनावर मात करू व निरोगी राहू.
- बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
----
फोटो ओळी : ११वडाळा
रॅपीड टेस्ट करून घेताना बळीराम साठे,डॉ. बारसोळे, प्रताप पाटील, दिनेश साठे, आरोग्यसेविका टेकाळे आदी.