करमाळ्यात व्यापाऱ्यांसाठी चाचण्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:22 AM2021-04-02T04:22:42+5:302021-04-02T04:22:42+5:30
करमाळा : नगरपरिदेच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांसाठी १ ते ५ एप्रिल या कालावधीत जुनी नगरपालिका इमारत, पुणे रोड ...
करमाळा : नगरपरिदेच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांसाठी १ ते ५ एप्रिल या कालावधीत जुनी नगरपालिका इमारत, पुणे रोड येथे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कोरोनाची चाचणी होणार आहे.
ही चाचणी केल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल देण्यात येणार असून, तो दुकानाच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे.
शहरातील सर्व व्यापारी, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फेरीवाले, टपरीधारक, सलून, ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने व मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केले आहे.
करमाळा शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, पोलीस, बँक, नगरपरिषद, पंचायत समिती, पोस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती, वीज वितरण, शाळा काॅलेजमधील कर्मचाऱ्यांनीही कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चाचणी करणे व बाधित रुग्णास लवकरात लवकर उपचार देणे यासाठी कोरोना चाचणी शिबिर आयोजित केले आहे.
----