ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार

By Appasaheb.patil | Published: May 29, 2021 02:27 PM2021-05-29T14:27:12+5:302021-05-29T14:28:06+5:30

किरीट सोमय्या यांची माहिती- सोमय्या यांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

Thackeray government hides information about Kovid's death; BJP will conduct special audit of Kovid's death | ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार

ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार

googlenewsNext

सोलापूरउद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील कोव्हिड मृत्यूंची माहिती लपवली आहे. त्यामुळे भाजप येत्या काळात महाराष्ट्रातील कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तेरा महत्त्वाच्या शहरांमध्ये माझ्यासह किरीट आणखी दोन सीए मिळून हे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 

किरीय सोमय्या हे आज सोलापूर दौर्यावर आहेत. त्यांनी प्रारंभी शासकीय रूग्णालय व मार्केडेय रूग्णालयास भेट दिली. याचवेळी त्यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही माहिती आहे की, भारतात लसींचे उत्पादन दोन कंपन्या करतात आणि त्यातील महत्त्वाची कंपनी ही पुण्यात असून, त्याचे मालक हे शरद पवारांचे मित्र आहेत. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वर्षात 10 कोटी होत असेल तर देशातील सर्व लोकांना लस मिळायला बारा महिने लागणार आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लसीचा काय संबंध आहे, असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर येत्या 31 डिसेंबरपर्यंत भारतात अडीचशे कोटी लसी येणार आहेत. त्यातील सव्वादोनशे कोटी लसी भारतात बनवल्या जाणार आहेत, तर पंचवीस कोटी लसी इंपोर्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक भारतीयांच लसीकरण झालेलं असेल, असंही किरीट सोमय्या या वेळी म्हणाले.

Web Title: Thackeray government hides information about Kovid's death; BJP will conduct special audit of Kovid's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.