ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकार जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:48+5:302021-06-27T04:15:48+5:30
मंगळवेढा-सोलापूर रोडवरील टोलनाक्याजवळ ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे, यासाठी भाजपने चक्का जाम आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रणव ...
मंगळवेढा-सोलापूर रोडवरील टोलनाक्याजवळ ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे, यासाठी भाजपने चक्का जाम आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रणव परिचारक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा चिटणीस संतोष मोगले,
जिल्हा चिटणीस सिद्धेश्वर कोकरे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा चिटणीस हौसाप्पा शेवडे, अविनाश मोरे, बिभीषण बेदरे, विजय बुरकुल, विष्णू मासाळ, सुधाकर माळी, विठ्ठल सरगर, सुशांत हजारे, सुदर्शन यादव आदी उपस्थित होते.
एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले आहे.
आ. समाधान आवताडे यांनी आंदोलन दरम्यान राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. फक्त महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना मिळालेले राजकीय आरक्षण गेले आहे.
न्यायालयाला हवा असलेला इम्पेरिकल डाटा त्यांनी दिला नाही. आयोगाची निर्मिती न केल्यामुळे आरक्षण गेले. हे राजकीय आरक्षण परत मिळवणे हीच भाजपची घोषणा आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ, असे आवताडे म्हणाले.