मोटरसायकल रॅलीने सोलापुरातील शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचा झाला जागर

By Appasaheb.patil | Published: January 23, 2024 04:28 PM2024-01-23T16:28:21+5:302024-01-23T16:29:20+5:30

उद्योजक तथा नाट्यसंमेलनाचे मार्गदर्शक दत्ता आण्णा सुरवसे यांच्या हस्ते मोटार सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

The 100th Divisional Theater Conference in Solapur was celebrated with a motorcycle rally | मोटरसायकल रॅलीने सोलापुरातील शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचा झाला जागर

मोटरसायकल रॅलीने सोलापुरातील शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचा झाला जागर

सोलापूरसोलापुरात सुरू असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या प्रचाराने प्रसारासाठी काढण्यात आलेल्या मोटर सायकल रॅलीत बहुसंख्य महाविद्यालयीन विद्यार्थी, नाट्य  रसिक, रंगकर्मी, नाट्य परिषदेचे पदाधिकारी, समितीचे सदस्य यांच्यासह सहाशे नागरिक सहभागी झाले होते. 

दरम्यान,  उद्योजक तथा नाट्यसंमेलनाचे मार्गदर्शक दत्ता आण्णा सुरवसे यांच्या हस्ते मोटार सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे, प्रा. वडजे, स्वागत सचिव प्रशांत बडवे, समन्वयक कृष्णा हिरेमठ, रणजित गायकवाड प्रमुख उपस्थित होते.  ही रॅली नॉर्थकोट ग्राउंड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रामलाल चौक, रेल्वे स्टेशन, कुमार चौक,  फॉरेस्ट, एम्प्लॉयमेंट चौक, मोदी पोलिस चौकी, सात रस्ता पोलीस अयुक्त,  कुमठा नाका, सत्तर फूट रस्ता, वालचंद कॉलेज, पॉलिटेकनिक कॉलेज पाण्याची टाकी, जोडबसवन्ना चौक, राजेंद्र चौक, कन्ना चौक, कौतम चौक, मधला मारुती, बाळीवेस, कस्तुरबा मंडई, सम्राट चौक, जी.एम.चौक, एस.टी.स्टँड, भागवत टॉकीज, सरस्वती चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नॉर्थकोट मैदानावर झाला.

बाईक रॅलीचे प्रमुख सतीश सुरवसे, सारिका सुरवसे, आशुतोष नाटकर, प्रशांत शिंगे, सीमा यलगुलवार, शांता येलंबकर, रजनी दळवी, अमृता गोसावी, मिलिंद पटवर्धन, किरण फडके, महेश निकंबे, इसाक शेख, आनंद मुस्तारे, किरण लोंढे, विश्वजीत माणिकशेट्टी, राजश्री तडकासे बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The 100th Divisional Theater Conference in Solapur was celebrated with a motorcycle rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.