आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 12:57 PM2022-07-13T12:57:38+5:302022-07-13T12:57:45+5:30

घ्या रे घ्या रे दहींभात ! आम्हा देतों पंढरीनाथ !! 

The Ashadi ceremony was sweetened by Gopalkala; Thousands of devotees took darshan of Shri Krishna | आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन

आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन

googlenewsNext

पंढरपूर - टाळ मृदंगांच्या गजरात ज्ञानोबा-तुकाराम चा जयघोष करीत आषाढी यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांनी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काल्याचा उत्सव साजरा केला. या सोहळ्यानंतर  गोपालकाला गोड झाला गोपाळाने गोडकेला असे म्हणत विविध दिंड्यांनी पंढरपूर मधून आळंदीकडे प्रस्थान केले.

आषाढी व कार्तिकीकेला काला करण्याची येथे परंपरा आहे. आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पौर्णिमेला गोपाळपुरात गोपाळकाला होतो. गेली पाच-सहा दिवसांपासून पंढरीत दाखल असलेल्या भाविकांनी बुधवारी पहाटेपासूनच गोपाल काल्यासाठी शहरात सर्वत्र गर्दी झाली केली. दिंडीतील वारकरी सकाळी चंद्रभागेत स्नान करून शहर प्रदक्षिणा करीत गोपाळपूर कडे जात होते. गोपाळपूर येथे श्रीकृष्णचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरात पहाटे गोपाळकृष्णास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आकर्षक पेहराव करून काकडा आरती झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहाटे मानाची दहीहंडी फोडण्यात आली.

गोपाळपूर येथे आलेल्या दिंड्या मंदिरातील मोठ्या पितळी हंड्यात लाह्याटाकून परंपरेचे काल्याचे किर्तन करून वारक-यांना भाविकांना दही लाह्याचा प्रसाद देत होते. मंदिरास प्रदक्षिणा करून आलेल्या हजारो भाविकांनी परतीची वाट धरली.

 

 

Read in English

Web Title: The Ashadi ceremony was sweetened by Gopalkala; Thousands of devotees took darshan of Shri Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.