सिमी संघटनेवरील बंदी वाढविली!
By रवींद्र देशमुख | Published: March 18, 2024 07:43 PM2024-03-18T19:43:19+5:302024-03-18T19:43:32+5:30
पोलिसांना केंद्राचे पत्र: संशयास्पद हालचालींची खबर देण्याचे आवाहन
सोलापूर : देशभर बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेवरील बंदीला केंद्र सरकारकडून पुन्हा बंदीसाठी मुदतवाढ दिली असल्याचे पत्राद्वारे पोलिस आयुक्तालयास कळवण्यात आले आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की, केंद्रीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियम १९६७ अन्वये ‘सिमी’ संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. या बंदीची मुदत संपताच पुन्हा मुदतवाढ दिली असल्याचे पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी स्पष्ट केले.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर झाली आहे. त्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सर्वत्र चोख बंदोबस्तासह चेक पाइंट, दंगापथक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची तुकडी तैनात केली आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना खबर द्यावी, असे आवाहन केले आहे.