ते स्वप्न अपूर्णच... भाविक वारकऱ्यांसाठी पंढरपूर भेटीत व्यक्त केली होती इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:04 AM2023-08-03T10:04:06+5:302023-08-03T10:06:38+5:30

विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रा कालावधीत लाखो भाविक पंढरपुरात येतात.

The desire was expressed in the visit to Pandharpur for devotees by nitin desai in pandharpur | ते स्वप्न अपूर्णच... भाविक वारकऱ्यांसाठी पंढरपूर भेटीत व्यक्त केली होती इच्छा

ते स्वप्न अपूर्णच... भाविक वारकऱ्यांसाठी पंढरपूर भेटीत व्यक्त केली होती इच्छा

googlenewsNext

ज्योतिराम शिंदे 

सोलापूर/पंढरपूर : श्री विठ्ठल हे सर्वसामान्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांना सलग आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी पंढरपुरात ६५ एकर परिसरात श्री विठ्ठलाची १०० फुटी मूर्ती उभी करू, असा मानस चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी पाच वर्षांपूर्वी विठ्ठल दर्शनाला आल्यानंतर व्यक्त केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी त्यांना विठ्ठल दर्शनासाठी आणले होते. मात्र, त्यांनी बुधवारी आत्महत्या केल्याने देसाई आणि भाविकांचे १०० फुटी विठ्ठल मूर्तीचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रा कालावधीत लाखो भाविक पंढरपुरात येतात. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेऊ न शकलेले भाविक मंदिराच्या कळसाचे व मुखदर्शन घेतात. अशा भाविकांना विठ्ठलाचे दर्शन मिळावे म्हणून ६५ एकर परिसरात विठ्ठलाची शंभर फुटी भव्य मूर्ती उभी करू, असे दिग्दर्शक नितीन देसाई यांनी ५ वर्षांपूर्वी पंढरपुरात आल्यानंतर सांगितले होते. मात्र, तांत्रिक अडचण आल्याने विठ्ठलाची मूर्ती उभी राहू शकली नाही. बुधवारी नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यानंतर पंढरपुरातील त्यांची आठवणीला उजाळा देण्यात आल्या 

प्रजासत्ता दिनी दिल्लीतील चित्ररथालाप्रथम क्रमांक

■ दर्शनासाठी येणाया भाविकांना पंढरपुरातील चारही बाजूंच्या रस्त्याकडून विठ्ठलाचे दर्शन लांबूनच होणार होते, हे स्वप्नही अधुरेच राहिले आहे.
■ यापूर्वी नितीन देसाई यांनी प्रजासत्ताकदिनी पालखी मार्गाचा चित्ररथ दिल्लीच्या राजपथावर साकारला होता. त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
मिळाले होते. 
 

Web Title: The desire was expressed in the visit to Pandharpur for devotees by nitin desai in pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.