सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली गिरीष महाजनांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण
By Appasaheb.patil | Published: March 15, 2024 02:01 PM2024-03-15T14:01:44+5:302024-03-15T14:02:41+5:30
राज्यातील ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे अशा मागण्या.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अडचणीबाबत चर्चा करून लवकरच मुंबईत बैठक घेऊ असे आश्वासन दिले.
राज्यातील ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे यासाठी बैठक आयोजित करावे असे विविध आठ मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर समक्ष भेटून चर्चा करून देण्यात आले. याबाबतीत मुंबई येथे बैठक आयोजित करू असे आश्वासन युनियनचे शिष्टमंडळाला देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने २००५ पूर्वीचे जाहिराती च्या अनुषंगाने जुनी पेन्शन साठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग दोन मधील तातडीने विशेषतः पुणे विभाग मागे आहे , ती पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावी.
पशुसंवर्धन विभागाचे नव्याने झालेले पुनर्रचना स्थगित करून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निवेदन विचारात घेऊन याबाबतीत सुधारित निर्णय जाहीर करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री महाजन यांना देण्यात आले. यावेळी आ. विजयकुमार देशमुख उपस्थित होते. या चर्चेस राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉ. एस. पी .माने, जिल्हा अध्यक्ष तजमुल मुतवली, डॉ.नाना सातपुते, योगेश हब्बु, भीमाशंकर कोळी, विलास मसलकर, बसवराज दिंडोरे, राजीव गाडेकर, अभिमन्यू कांबळे, पी.सी कविटकर, राकेश सोड्डी, रोहित घुले, संतोष शिंदे,विशाल घोगरे, श्रीशैल देशमुख, चेतन वाघमारे, युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.