सोमवारपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार 

By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 4, 2023 10:20 PM2023-02-04T22:20:48+5:302023-02-04T22:20:58+5:30

परीक्षा संचालक डॉ. गणपुर यांची माहिती 

The examinations of Solapur University will start from Monday as per the scheduled schedule | सोमवारपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार 

सोमवारपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार 

Next

बाळकृष्ण दोड्डी 
सोलापूर : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवार, ६ फेब्रुवारी पासून नियोजित जाहीर अंतिम वेळापत्रकानुसार सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या  (ऑक्टोबर-नोव्हेंबर-2022)  विद्यापीठ आयोजित परीक्षा 23 जानेवारी पासून सुरू झाले होते. मात्र महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलनामुळे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या. आता शासनाच्या आदेशानुसार. ६ फेब्रुवारी पासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर अंतिम वेळापत्रकानुसार ज्या-त्या दिवसाची परीक्षा सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपुर यांनी काढले आहे. याची माहिती संबंधित सर्व महाविद्यालये, संस्था चालक व अधिविभाग प्रमुखांना कळविले आहे.

Web Title: The examinations of Solapur University will start from Monday as per the scheduled schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.