चुलीला धक्का लागल्यानं पोळकं पाणी अंगावर पडून बालिका भाजली
By विलास जळकोटकर | Published: January 6, 2024 07:57 PM2024-01-06T19:57:24+5:302024-01-06T19:57:54+5:30
सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान ती येत होती. वाटेत अमर बाबरे यांच्या घरासमोर चुलीवर पाणी तापवण्यास ठेवलेले होते.
सोलापूर : रोडवरुन घराकडे येत असताना वाटेत चुलीवर तापवलेल्याच्या पाण्याकडे लक्ष न गेल्याने ६ वर्षाच्या मुलीचा चुलीला धक्का लागून पोळकं पाणी तिच्या सर्वांगावर पडल्याने ती भाजली. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सिद्धार्थ चौक, बुधवार पेठेत ही घटना घडली. आराध्या हणमंत गायकवाड (वय- ६, रा. हनुमान नगर, भवानी पेठ, सोलापूर) असे जखमी मुलीचे नाव आहे. यातील भाजलेली मुलगी आराध्या गेल्या महिन्यापासून आईकडे सिद्धार्थ चौक येथे राहण्यास आहे.
सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान ती येत होती. वाटेत अमर बाबरे यांच्या घरासमोर चुलीवर पाणी तापवण्यास ठेवलेले होते. याकडे तिचे लक्ष गेले नाही. चुकून तिचा चुलीवरील पाणी तापवण्यास ठेवलेल्या भांड्याला धक्का लागला. यामुळे पडल्याने तापते पाणी तिच्या पोटावर, पाठीवर, मांड्यांवर पडल्याने तिचे सर्वांग भाजले. यात तिला त्रास होऊ लागल्याने आई सारिका गायकवाड हिने तातडीने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.