आजोबा रागावले अन् नातवानं घेतलं गवतावर फवारायचं कीटकनाशक
By दिपक दुपारगुडे | Published: July 16, 2024 07:27 PM2024-07-16T19:27:43+5:302024-07-16T19:28:11+5:30
कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाला दुपारी ३:१५ च्या सुमारास त्याचे आजोबा काही कारणांमुळे रागावले. हा राग सहन न झाल्याने घरापासून ५०० मीटर अंतरावर जाऊन घरात गवतावर फवारण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक त्याने प्राशन केले.
सोलापूर : हल्ली मोठ्या माणसानं चुकीसाठी रागवावं की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात आजोबा रागावले म्हणून १९ वर्षीय नातवानं चक्क गवतावर फवाराचं कीटकनाशकच घेतलं. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्याला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महांतेश शिवानंद झळकी (वय १९, रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) असे या मुलाचे नाव आहे.
कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाला दुपारी ३:१५ च्या सुमारास त्याचे आजोबा काही कारणांमुळे रागावले. हा राग सहन न झाल्याने घरापासून ५०० मीटर अंतरावर जाऊन घरात गवतावर फवारण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक त्याने प्राशन केले. काही वेळानं त्याला त्रास होऊ लागला. त्याच्यावर खासगी व सरकारी दवाखान्यात उपचार करुन येथील शासकीय रुग्णालयात मामा नागेंद्र यांनी दाखल केले. तो अर्धवट शुद्धीत असल्याचे सांगण्यात आले.