भाविकाचं मोठेपण; पेन्शनच्या रकमेतून विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण
By Appasaheb.patil | Published: July 31, 2023 12:47 PM2023-07-31T12:47:34+5:302023-07-31T12:47:50+5:30
नामदेव श्रावण पाटील (वय ९१, रा. औदुंबर नगर, अमतधाम, पंचवटी, नाशिक) असे भाविकाचे नाव आहे.
सोलापूर : वनविभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनची मोठी रक्कम मिळाली. या मिळालेल्या रकमेतून नाशिकच्या एका भाविकाने पंढरपुरच्या विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा सुंदर नक्षीकाम केलेला टेम्पल हार अर्पण केला. दरम्यान, हा हार विठ्ठलास परिधान केल्यानंतर विठ्ठलाचे रूप मनमोहक दिसत होते. नामदेव श्रावण पाटील (वय ९१, रा. औदुंबर नगर, अमतधाम, पंचवटी, नाशिक) असे भाविकाचे नाव आहे.
दरम्यान, नामदेव पाटील हे वनविभागात नोकरीस होते. तेथून ते सेवानिवृत्त झाले, त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पेन्शनमधून त्यांनी सोन्याचा टेम्पल हार विठ्ठलास अर्पण केला. या भाविकाचा श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या अगोदरही अनेक भाविकांची विठ्ठल-रूक्मिणी मातेस सोन्याचे हार, टोप, मुकूट, सोन्या-चांदीचे कपडे अर्पण केले आहेत. विशेषत: आषाढी, कार्तिकी यासह अन्य एकादशीच्या निमित्ताने भाविक विठ्ठलास वस्तू अर्पण करतात.