गटशिक्षणाधिकारी ग्रामस्थांना म्हणाल्या...'चालते व्हा'; अधिकाऱ्यांची शिष्ठाई झाली, उपोषणकर्त्यांपुढे नरमल्या
By काशिनाथ वाघमारे | Published: July 22, 2023 08:12 PM2023-07-22T20:12:00+5:302023-07-22T20:12:58+5:30
अक्कलकोट तालुक्यात वागदरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत.
सोलापूर : कमी शिक्षक संख्येच्या मुद्यावर उपोषणकर्त्यांमुळे महिला गटशिक्षणाधिकारी अडचणीत आल्या. विषय तापू लागताच पोलिस अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी मध्यस्थी केली आणि माझ्या ऑफीसमधून चालते व्हा.. म्हणणा-या कुसुमिया शेख ग्रामस्थांपुढे दिलगिरी व्यक्त करीत चांगल्याच नरमल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले.
अक्कलकोट तालुक्यात वागदरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. बुधवार, १९ जुलै रोजी याबाबत अक्कलकोट पंचायत समिती मधील शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी कुसुमिया शेख यांना भेटून ग्रामस्थ चर्चा करीत होते. इतक्यात तावातावात त्या ग्रामस्थांना 'माझ्या ऑफीस मधून चालते.. व्हा. वरिष्ठ कार्यालयात जाऊन भेटा.. माझ्या हातात काही नाही' म्हणाल्याचा आरोप करीत चिडलेल्या ग्रामस्थांनी शाळेसमोरच उपोषण सुरू केले.
वागदरीचे शिवसेना शाखा प्रमुख मृगेंद्र मुंदनखेरी यांच्या नेतृत्वाखाली, गोपी सावंत, राजू हुग्गे, राज यादव, संजय चौगुले, शरणाप्पा सुरवसे यांनी उपोषण सुरू केले. दोन दिवसानंतरही ते उपोषण मागे घेत नव्हते. ग्रामस्थांचा रोष वाढला आणि प्रकरण तापत असताना पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि गटविकास अधिकारी खुडे यांनी मध्यस्ती करीत उपोषणकर्त्यांचा रोष कमी केला. त्यांनी मध्यस्थिची भूमिका बजावली आणि या ठिकाणी उपोषणकर्त्यांपुढे गटशिक्षणाधिकारी कुसुमिया शेख यांनी फोनवरुन दिलगिरी व्यक्त करीत नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
वागदरी येथे गटशिक्षणाधिकारी विरोधात सुरू असलेल्या उपोषण कर्त्यांना चर्चेदरम्यान समजूत घालताना गटविकास अधिकारी खुडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी