उन्हाचा तडाखा वाढला; तापमानाने पुन्हा गाठली चाळिशी, सोलापूर @४०.६ :
By शीतलकुमार कांबळे | Published: April 15, 2024 07:59 PM2024-04-15T19:59:58+5:302024-04-15T20:00:48+5:30
शनिवार १३ एप्रिल रोजी मागील आठवड्यातील सर्वात कमी ३७.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तेंव्हापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ होत आहे.
सोलापूर : सतत वाढणाऱ्या तापमानाला ११ एप्रिलपासून ब्रेक लागला होता. पाऊस पडल्यामुळे कमाल तापमानात घट झाली होती. आता मात्र पुन्हा कमाल तापमानात वाढ होत असून सोमवार १५ एप्रिल रोजी तापमानाने पुन्हा चाळिशी गाठली.
शनिवार १३ एप्रिल रोजी मागील आठवड्यातील सर्वात कमी ३७.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तेंव्हापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ होत आहे. सोलापूरचे तापमान काही दिवस ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. मात्र, पाऊस व ढगाळ वातावरण नसल्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होत आहे. चार दिवसानंतर पाचव्या दिवशी सोलापूरच्या तापमानाने चाळिशी गाठली.
वाढलेल्या तापमानामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही होवू लागली होती. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांनी डोक्यात टोपी, तर, काहींनी छत्री घेवून बाहेर पडण्याच्या निर्णय घेतला. तर, अनेकांनी थंड पेयाच्या गाड्यांवर आपला मोर्चा वळविला असल्याचे दिसून आले.