उन्ह तापू लागले...सोलापूरचा पारा ३७ अंशावर पोहोचला; रस्त्यावरही शुकशुकाट दिसू लागला
By Appasaheb.patil | Published: February 26, 2023 06:16 PM2023-02-26T18:16:13+5:302023-02-26T18:16:22+5:30
सकाळी, रात्री थंडी अन् दिवसा कडक उन्ह
सोलापूर : फेब्रुवारीच्या महिना अखेरीस सूर्य तापू लागला आहे. मागील आठवडयात ३६ अंशावर असलेले तापमान या आठवड्यात ३७ अंशावर पोहोचले आहे. सकाळी थंडी अन् दिवसा कडक उन्ह या दुहेरी हवामानाचा परिणामामुळे सोलापूरकरांच्या आराेग्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या उन्हामुळे शहरातील बरेच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
राज्यात सर्वत्र हवामान कोरडे असून अनेक शहरातील तापमानात मोठी वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरातील कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. दिवसभराच्या उन्हाच्या झळांनंतरही रात्रीही हवेत चांगलाच गारठा जाणवत आहे. शिवाय उकाडाही वाढल्याचे बोलले जात आहे. रविवारी दिवसभर नागरिकांनी एसी आणि फॅनच्या हवेखाली आसरा घेतल्याचे दिसत होते. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी लिंबू पाण्याच्या गाड्यांवरही नागरिकांनी धाव घेतली.
मागील पाच दिवसातील तापमान
तारीख- कमाल - किमान
- २२ फेब्रुवारी - ३७.० - १८.०२
२३ फेब्रुवारी - ३७.०६ - १८.०२,
२३ फेब्रुवारी - ३७.०६ - १८.०२,
२४ फेब्रुवारी - ३७.०६ २०.०५,
२५ फेब्रुवारी - ३७.०२ - १८.०६,
२६ फेब्रुवारी - ३७.०० - १८.०७
आरोग्याची काळजी घ्या...
तापमानात वाढ होताना दिसत आहे. उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसत आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे . त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेच्या विकारात उन्हाळ्यात वाढ होत भरपूर पाणी पिल्यास डिहायड्रेशनचे प्रमाण कमी होते . त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.