भावाकडं आलेल्या बहिणीचा नवऱ्यानं सोलापुरात येऊन केला चाकूनं गळ्यावर वार

By विलास जळकोटकर | Published: August 24, 2023 02:57 PM2023-08-24T14:57:47+5:302023-08-24T14:58:06+5:30

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून भावाकडे राहण्यास आलेल्या बहिणीचा नवऱ्यानं सोलापुरात येऊन तिच्या गळ्यावर चाकूने वार करुन जखमी केले.

The husband of the sister who came to her brother came to Solapur and stabbed her in the neck with a knife | भावाकडं आलेल्या बहिणीचा नवऱ्यानं सोलापुरात येऊन केला चाकूनं गळ्यावर वार

भावाकडं आलेल्या बहिणीचा नवऱ्यानं सोलापुरात येऊन केला चाकूनं गळ्यावर वार

googlenewsNext

सोलापूर : नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून भावाकडे राहण्यास आलेल्या बहिणीचा नवऱ्यानं सोलापुरात येऊन तिच्या गळ्यावर चाकूने वार करुन जखमी केले. गुरुवारी सकाळी ८:३० च्या सुमारास विनायक नगर येथे ही घटना घडली. पूजा बाळू क्षीरसागर (वय- २४, रा. आंबेडकर नगर,  पंढरपूर, सध्या विनायक नगर, सोलापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती बाळू क्षीरसागर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मुळच्या रोपळे येथील जखमी पूजाचा विवाह पंढरपुरातील बाळू क्षीरसारगर याच्याशी आठ वर्षापूर्वी झाला आहे. अनेक वर्षांपासून त्याला दारुचे व्यसन आहे. बिगारी काम करुन हे कुटुंब गुजराण करते. नेहमी बायको पूजाशी तो भांडायचा. या त्रासामुळे पूजा सोलापुरात उपजीविकेसाठी आलेल्या नितीन खरे या भावाकडे विनायकनगरमध्ये आठ दिवसापूर्वी आली होती.

गुरुवारी सकाळी भाऊ त्याच्या पत्नीला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यामुळे रुग्णालयातच होता. घरी पूजा आणि तिचा मुलगा दोघेच होते. या दरम्यान बाळू घरी आला. येथे पती-पत्नीचे भांडण झाले. यातच बाळूने चाकूने पूजाच्या गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केल्याचे भाऊ नितीन खरे यांनी सांगितले.

जवळच राहणाऱ्या मावशी संगीता बाबरे यांना पूजावर वार झाल्याचे कळताच तिने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या गळ्यावर खोलवर जखम झाल्याने ती शुद्धीवर आहे मात्र बोलू शकत नाही, असे सांगण्यात आले.

Web Title: The husband of the sister who came to her brother came to Solapur and stabbed her in the neck with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.