पुण्याला जाणारी इंटरसिटी सलग दुसऱ्या दिवशी धावली उशिराने
By रूपेश हेळवे | Updated: June 11, 2024 20:15 IST2024-06-11T20:14:48+5:302024-06-11T20:15:03+5:30
ही गाडी मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातून मार्गस्थ झाली.

पुण्याला जाणारी इंटरसिटी सलग दुसऱ्या दिवशी धावली उशिराने
सोलापूर : पुण्यात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी मांडली. यामुळे याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत आहे. सोलापुरातून मुंबईकडे आणि मुंबईहून सोलापूरकडे धावणार्या रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. यात दुपारी दोन वाजता सोलापुरातून पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी सलग दूसर्या दिवशीही सोलापुरातून दोन तास उशिराने धावली, म्हणजेच ही गाडी मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातून मार्गस्थ झाली.
मागील काही दिवसापासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनेक गाड्यांना वारंवार उशीर होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सोलापुरकरांसाठी महत्वाच्या असणार्या अनेक गाड्यांना उशीर होत असल्याने प्रवाशी रेल्वेने जाण्या ऐवजी इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करत आहेत, अशी माहिती काही प्रवाशांनी दिली.