दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम पूढे सरकेना; जिल्हाधिकारी म्हणाले, अन्य शहरातून माहिती घ्या

By बाळकृष्ण दोड्डी | Published: October 19, 2023 02:10 PM2023-10-19T14:10:45+5:302023-10-19T14:11:10+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

The land acquisition work for both the flyovers has not progressed; Collector said, get information from other cities | दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम पूढे सरकेना; जिल्हाधिकारी म्हणाले, अन्य शहरातून माहिती घ्या

दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम पूढे सरकेना; जिल्हाधिकारी म्हणाले, अन्य शहरातून माहिती घ्या

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : जुना पुना नाका ते पत्रकार भवन उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या विविध विभागाशी पाठपुरावा करून त्या जागेचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत. शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अन्य शहरातील उड्डाणपूलांच्या भूसंपादन प्रक्रियेची अभ्यासपूर्ण माहिती घेण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महापालिकेच्या उड्डाणपूलच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी भूसंपादन अधिकारी प्रशांत देशमुख, माढा प्रांत ज्योती आंबेकर, भूसंपादन अधिकारी श्रावण क्षीरसागर, मंगळवेढा प्रांत अमित माळी, सोलापूर महापालिकेच्या उपअभियंता आकुलखवार आदी उपस्थित होते.

Web Title: The land acquisition work for both the flyovers has not progressed; Collector said, get information from other cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.