सोलापूर शहरातील तीन बागांचा लूक बदलणार, महापालिका तीन कोटी खर्च करणार

By Appasaheb.patil | Published: March 10, 2023 07:42 PM2023-03-10T19:42:28+5:302023-03-10T19:43:08+5:30

सोलापूर : माझी वसुंधरा अभियानातंर्गत मिळालेल्या दोन कोटी रूपयांच्या अनुदानातून महापालिका शहरातील तीन बागांचा विकास करणार आहे. या विकासकामांमुळे ...

The look of three gardens in Solapur city will be changed, the municipality will spend three crores | सोलापूर शहरातील तीन बागांचा लूक बदलणार, महापालिका तीन कोटी खर्च करणार

सोलापूर शहरातील तीन बागांचा लूक बदलणार, महापालिका तीन कोटी खर्च करणार

googlenewsNext

सोलापूर : माझी वसुंधरा अभियानातंर्गत मिळालेल्या दोन कोटी रूपयांच्या अनुदानातून महापालिका शहरातील तीन बागांचा विकास करणार आहे. या विकासकामांमुळे बागांचे रूपडे पालटणार असून त्याचा लूकही मोठया प्रमाणात बदलण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान राबविले. या अभियानाच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला दोन कोटी रूपयांतून महापालिका शहरातील तीन बागा चांगले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या तीन बागांमध्ये १ कोटी रूपयांचे एलईडी दिवे, खेळणी, वृक्षारोपन, वॉल कंपाऊड, वॉकिंग ट्रॅक आदी सेवासुविधा देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. याशिवाय जुळे सोलापुरातील एचआरएसवर सोलर बसविण्यात येणार आहे.

शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी बागा आहेत. मात्र त्याही बहुतांश बागा या वापराविना असल्याने तिथे अस्वच्छता पसरली आहे. आता उन्हाळ्यात मुलांना सुट्टी असते, त्या पार्श्वभूमीवर महापालिका बागांचा विकास करणार आहे. हळूहळू प्रत्येक बागांचा विकास महापालिका करणार असून लवकरच शहरातील सर्व बागा अद्यावत होतील असा विश्वास आयुक्तांनी वर्तविला आहे.

Web Title: The look of three gardens in Solapur city will be changed, the municipality will spend three crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.