दोन मुलांना गळफास देत मातेनेही केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 12:27 IST2024-03-04T12:26:37+5:302024-03-04T12:27:26+5:30
स्नेहा सरवदे यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल नेमके कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

दोन मुलांना गळफास देत मातेनेही केली आत्महत्या
सोलापूर : मुळेगाव रोड येथील सरवदेनगरामध्ये रविवारी दुपारी एका मातेने आपल्या दोन लेकरांसह गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. स्नेहा संतोष चिल्लाळ (वय ३०), संध्या संतोष चिल्लाळ (वय ११), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय ७, सोलापूर), अशी मयतांची नावे आहेत. शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले.
स्नेहा सरवदे यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल नेमके कारण मात्र गुलदस्त्यात आहे. यातील मयत स्नेहा यांनी अगोदर दोन मुलांना गळफास दिला असावा, त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.