आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:09 PM2023-01-13T14:09:35+5:302023-01-13T14:35:48+5:30

रविराज जनार्धन थोरबोले यांनी महावितरणमार्फत २३ नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेमध्ये एनटीसीमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे

The mother's labor cost, the Solapur son stood first in the state in the Mpsc exam | आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला

आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला

googlenewsNext

सोलापूर/मंगळवेढा : आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात आई कुठेच कमी पडत नाही. आई मोलमजुरी करुन, स्वत: कष्टाने भाकर मिळवून आपल्या लेकरांना मोठं करते, समाजात ताठ मानेनं फिरता यावं यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असते. मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे गावातील शांताबाई थोरबोले यांचीही गोष्ट अशीच आहे. काबाडकष्ट करुन, मोल मजुरी करुन या माऊलीने आपल्या दोन्ही मुलांना मोठं केलं, उच्च शिक्षण दिलं. आज, त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले. शांताबाई यांचा थोरला मुलगा महावितरणच्या परीक्षेत राज्यात पहिला आला. 

रविराज जनार्धन थोरबोले यांनी महावितरणमार्फत २३ नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेमध्ये एनटीसीमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आईच्या कष्टाचे चीज झाले आहे. मुलाच्या यशाच्या आनंदाने आई शांताबाई थोरबोले यांना आकाश ठेंगणे झाले. अपार कष्टाचे सोडले नाही. मुलाने चीज केल्याने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

रवी याने बारावीचे शिक्षण दामाजी कॉलेज मंगळवेढा तर भारती विद्यापीठ कोल्हापूर येथे इंजिनीअरींग शिक्षण झाले. आई- वडिलांचे कष्ट शिकून दूर करण्याचा निश्चय केला. २०१५ पासून आयआयटी तयारी, २०१७ पासून
शांताबाई थोरबोले रविराज थोरबोले यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. कोरोनामुळे गावाकडे नऊ महिने अभ्यास त्यानंतर २०२१ दिल्लीला गेला तिथे अभ्यास केला. आजपर्यंत विविध २० परीक्षा दिल्या यश आले नाही, म्हणून कधीही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. 

दरम्यान, आता १९ फेब्रुवारी रोजी यूपीएससीची परीक्षा असून यश मिळवण्याच्या दृष्टीने अभ्यासाची तयारी केली आहे. आई गावात मोलमजुरी करते, दोन्ही मुले हुशार मोठ्या कष्टाने मुलांना शिक्षण दिले. एका मुलाला अधिकारी बनविले तर दुसराही मुलगा लिंगराज एमपीएससीची तयारी करत आहे..
 

Web Title: The mother's labor cost, the Solapur son stood first in the state in the Mpsc exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.