पुढील तीन दिवस महत्वाचे; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनांची २४ तासांत दखल घ्या - जिल्हाधिकारी

By Appasaheb.patil | Published: July 15, 2024 03:25 PM2024-07-15T15:25:52+5:302024-07-15T15:26:05+5:30

काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयाची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत.

The next three days are important; Take note of the instructions given by the Chief Minister within 24 hours- Collector | पुढील तीन दिवस महत्वाचे; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनांची २४ तासांत दखल घ्या - जिल्हाधिकारी

पुढील तीन दिवस महत्वाचे; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनांची २४ तासांत दखल घ्या - जिल्हाधिकारी

सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयाची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागानी या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी व पुढील तीन दिवस अत्यंत लक्ष राहून आषाढी वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

भक्तनिवास येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी अमित माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश नवले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, आषाढी वारीनिमित्त १७ जुलै २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा होते. यावेळी पंढरपूर शहरात किमान दहा ते पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने मागील दोन महिन्यांपासून भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही ठिकाणी बदल तर काही सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत सांगण्यात आलेले असून त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अत्यंत तत्परतेने कामे पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले. 

जिल्हाधिकारी यांनी दिल्या या महत्वाच्या सुचना

- चौकाचौकातील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करा
- रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा
- स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ वापरा
- आराेग्य विभागाने अधिकचे अलर्ट राहावे
- चंद्रभागा नदीत बोटी चालविणाऱ्यांना लाईफ जॅकेट द्यावे
- प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

Web Title: The next three days are important; Take note of the instructions given by the Chief Minister within 24 hours- Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.