सोलापुरात कुत्र्यांची संख्या वाढली; आडवे आल्यानं दोघांना शेकाटलं!

By रवींद्र देशमुख | Published: August 17, 2023 07:10 PM2023-08-17T19:10:33+5:302023-08-17T19:11:41+5:30

रुग्णालयात उपचार, कलेक्टर ऑफिससमोरील घटना

The number of dogs increased in Solapur; Both of them got burnt because they fell down! | सोलापुरात कुत्र्यांची संख्या वाढली; आडवे आल्यानं दोघांना शेकाटलं!

सोलापुरात कुत्र्यांची संख्या वाढली; आडवे आल्यानं दोघांना शेकाटलं!

googlenewsNext

रवींद्र  देशमुख, सोलापूर: गेली काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने रोडवर अपघाताच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. बुधवारी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय व सिटी पार्कजवळील मशिदीसमोरील रोडवर कुत्रे आडवे आल्यानं दोघे दुचाकीस्वार रोडवर पडून जखमी झाले. दोघांनाही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यातील पहिल्या घटनेत इस्माईल शौकत कुरेशी (वय- १८, रा. विजापूर वेस, सोलापूर) हे बुधवारी दुपारी १:१५ च्या सुमारास विजापूर नाका ते विजापूर वेस येथे दुचाकीवरुन निघाले होते. नवीन जिल्हाधिकारी कार्यायासमोरील रोडवर आले असता कुत्र्यांची झुंड आडवी गेल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. यात त्यांच्या हाता-पायाला जखम झाली.

दुसरी घटनेत सुशांत सुनील वड्डेपल्ली (वय- १९, रा. रामवाडी, सोलापूर) हा तरुण दुचाकीवरुन रात्री ११ च्या सुमारास मोदी परिसरातून विजापूर वेसकडे जात होता. अचानक समोरुन कुत्रे आडवे आल्याने सुशांतचा तोल जावून तो रोडवर दुचाकीसह कोसळला. यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर जखम झाली.
दोन्ही घटनेतील जखमीच्या नातलगांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: The number of dogs increased in Solapur; Both of them got burnt because they fell down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.