वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवणाऱ्याला अटक! दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By संताजी शिंदे | Published: July 19, 2024 07:09 PM2024-07-19T19:09:19+5:302024-07-19T19:10:09+5:30
सविता श्रीकांत कस्तुरे (वय ७३ रा. लक्ष्मी विष्णू सोसायटी, कुमठा नाका) या राहत्या घराजवळ ७ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वॉकींग करीत होत्या.
सोलापूर : कुमठा नाका येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी येथील राहत्या घरासमोर वॉकींग करीत असताना, वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिस्कामारून नेल्याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मोटारसायकलसह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविता श्रीकांत कस्तुरे (वय ७३ रा. लक्ष्मी विष्णू सोसायटी, कुमठा नाका) या राहत्या घराजवळ ७ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वॉकींग करीत होत्या. वॉकींग झाल्यानंतर त्या घरात जाण्यासाठी लोखंडी प्रवेशद्वार उघडत असताना, पाठीमागून एक अज्ञात चोरटा जवळ आला. काही कळायच्या आता त्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन हिस्कावून मोटारसायकलवरून पळून गेला होता. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.
घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने व पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक दादासो मोरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे व बातमीदारांमार्फत गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीवरून पथकाने सुमित गोविंद इंगळे (मुळ रा. श्रीपत पिंपरी ता. बार्शी) याला १६ जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पथकातील पोलिस अमंलदार दिलीप किर्दक, संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, शैलेश बुगड, सायबर पोलिस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक गुरव व बाळासाहेब काळे यांनी पार पाडली.