अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 7, 2022 20:33 IST2022-12-07T20:33:24+5:302022-12-07T20:33:44+5:30
अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद करण्यात आला आहे.

अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद
सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला असून यामुळे कर्नाटककडे जाणाऱ्या एसटी गाड्यांचा मार्ग बुधवारी पुन्हा एकदा रोखण्यात आला आहे. अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या ९ एसटी गाड्यांचा मार्ग बुधवारी दुपारी रोखण्यात आला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटक मध्ये दगडफेक झाल्यामुळे महाराष्ट्रातही कर्नाटक गाड्यांवर दगडफेक करण्याचा इशारा काही महाराष्ट्र प्रेमी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. मागच्या आठवड्यात देखील सीमा प्रश्नावर महाराष्ट्रातील एसटी गाड्यांवर कर्नाटक मध्ये दगडफेक झाला. त्यामुळे चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील एसटी गाड्या कर्नाटकात गेल्या नाहीत. बुधवारपासून पुन्हा एसटी गाड्याचा मार्ग थांबवल्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे.