५० वर्षांची वारी फळाला; औरंगाबादच्या दाम्पत्याला श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 08:07 AM2022-11-05T08:07:52+5:302022-11-05T08:07:59+5:30
साळुंखे दाम्पत्य हे मागील ५० वर्षांपासून विठुरायाची यात्रा करत आहेत.
पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून पन्नास वर्षांपासून वारी करणाऱ्या उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी, जि.औरंगाबाद) या दाम्पत्याची निवड करण्यात आली. यामुळे साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकीय महापूजा करता आली आहे.
साळुंखे दाम्पत्य हे मागील ५० वर्षांपासून विठुरायाची यात्रा करत आहेत. त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एक वर्ष कालावधीचा मोफत प्रवासाचा पास सुपुर्द करण्यात आला.
उत्तमराव साळुंखे हे समाजकल्याण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, ते पन्नास वर्षांपासून वारी करत आहेत.
बा... विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर!
गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.