माेठी बातमी; उजनीत बुडालेली बोट १७ तासानंतर सापडली; बुडालेल्या सहा जणांचा शोध सुरूच
By Appasaheb.patil | Published: May 22, 2024 05:12 PM2024-05-22T17:12:28+5:302024-05-22T17:12:49+5:30
बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या बोटीचा शोध लागला असून बुडालेल्या लोकांचा शोधण्याचे काम एनडीआरएफ ची टीम करीत आहे
सोलापूर : इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येत असलेली बोट उजनी धरणाच्या पाण्यात बुडाल्याने सहा ते सात प्रवासी बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. बुधवारी सकाळी त्या बुडालेल्या सहा जणांची नावे समोर आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या बोटीचा शोध लागला असून बुडालेल्या लोकांचा शोधण्याचे काम एनडीआरएफ ची टीम करीत आहे.
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये आज मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाली होती. यातून एक जण पोहत आपला जीव वाचविला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र अंधारामुळे शोध कार्य थांबविण्यात आले होते मात्र पुन्हा बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केली. दुपारी दोन वाजता बोटीचा शोध लागला. बुडालेल्या लोकांना शोधण्याचे काम एनडीआरएफचे पथक करीत आहे. घटनास्थळावर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली असून पोलिस व महसूल प्रशासनातील अधिकारीही उपस्थित आहेत. दरम्यान, खा. सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाला भेट देत घटनेच्या परिस्थितीची माहिती जाणून घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सुचना दिल्या.