सोलापुरातील बेनक गणपतीच्या डोळ्यातील अश्रू थांबले; अंनिसने खरा प्रकार आणला समोर
By Appasaheb.patil | Published: August 28, 2022 05:57 PM2022-08-28T17:57:17+5:302022-08-28T17:57:35+5:30
सोलापूर : कुंभारी जवळील होटगी रॉड मार्गावर असलेल्या बेनक गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. या घटनेमूळे शहरात खळबळ उडाली ...
सोलापूर : कुंभारी जवळील होटगी रॉड मार्गावर असलेल्या बेनक गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. या घटनेमूळे शहरात खळबळ उडाली परंतु शहर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्रीय प्रमाण देत सर्व अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले. अखेर गणपतीच्या डोळ्यातील अश्रू थांबले आणि अंनिसच्या प्रयत्नास यश आले.
सणासुदीच्या दिवसात देवदेवतांचे महत्व अधिक दृढ व्हावे म्हणून काही लोकांनी बेनक गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले असा फोटो व व्हिडीओ काढला व व्हायरल केला. एवढेच नव्हे तर गणपतीची चांगली मूर्ती बसवावी व मोठे मंदिर बांधावे आशी गणपतीची इच्छा आहे अशा चर्चांना उत आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही अफवा समजताच त्यांनी मंदिरातील मूर्ती पाहून शास्त्रीय करणे सांगून रासायनिक अभिक्रिया हातचलाकी मुळे आशा घटना घडतात हे सिद्ध करून दाखविले. गावकऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले व त्यांनी अंनिसच्या प्रबोधनास प्रतिसाद देत ही अफवा असल्याचे मान्य केले. पुजाऱ्याने फोटो व व्हिडीओ काढून ही अफवा पसरवली व ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. यापासून नागरिकांनी संवाद राहावे असे पत्रक अंनिस सोलापूर शाखेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले. यासाठी सोलापूर अनिसच्या टिम मधील राज्य कार्यकारिणी सदस्या निशा भोसले, अंजली नानल, उषा शहा, लता ढेरे , शहर अध्यक्ष प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, कार्याध्यक्ष व्ही.डी.गायकवाड ,सचिव लालनाथ चव्हाण, आर.डी.गायकवाड, ब्रम्हानंद धडके, यशवंत फडतरे, कुंडलिक मोरे, डॉ अस्मिता बालगावकर, कमलाकर जाधव, गोरख सांगळे, नितीन अणवेकर यांनी प्रयत्न केले.